ताज्या बातम्या

*म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर* 

 

म्हसावद ता.जळगाव दि.11 रोजी.३३/११ के.व्ही. म्हसावद उपकेंद्र येथे सारा हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; 200 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

३३/११ के.व्ही. उपकेंद्र, म्हसावद येथील श्री गजानन महाराज मंदिर ५ व्या वर्धापन दिनानिमित्त सारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 200 हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.

शिबिरामध्ये ईसीजी, हार्ट रेट, रक्तदाब (बी.पी.), उंची-वजन, ऑक्सिजन पातळी (SpO₂) तसेच रँडम ब्लड शुगर आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. सारा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच 600 नागरिकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. साळी. व्हि. एस. कापुरे उपकार्यकारी अभियंता जळगाव ग्रामीण उपविभाग व जळगाव विभागातील महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.तसेच म्हसावद व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी आयोजक व सारा हॉस्पिटलचे कौतुक केले.

श्री गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्यसेवेचा सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमातून नागरिकांमध्ये नियमित आरोग्य तपासणीबाबत जनजागृती निर्माण झाली.

या प्रसंगी महावितरण अधिकारी व कर्मचारी, सारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक, गजानन महाराज मंदिराचे सेवेकरी तसेच म्हसावद परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन म्हसावद कनिष्ठ अभियंता अर्जुन आव्हाड वावडदे कनिष्ठ अभियंता आकाश सोनवणे तसेच म्हसावद आणि वावडदे कक्षातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button