जळगाव

खरीप हंगाम २०२५ नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय १६ मे रोजी आढावा बैठक

जळगाव, दि. १५ मे (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२५ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशके यासह शेतकऱ्यांना आवश्यक निविष्ठा उपलब्धतेबाबत, कृषी विभाग आणि संलग्न विभागाच्या विविध योजना, मोहिमा, तंत्रज्ञान आणि आगामी हंगामासाठीचे नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीस जिल्ह्यातील सर्व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

खरीप हंगाम नियोजनाच्या बैठकीत पुढील विषयांचा समावेश करण्यात येणार आहे: मागील वर्षीच्या खरीप बैठकीतील मुद्यांचा अनुपालन अहवाल, जिल्ह्याची सर्वसाधारण कृषि माहिती, मागील वर्षाचा क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता अहवाल, यावर्षासाठीचे लक्षांक, पर्जन्यमान स्थिती, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन पिक नियोजन, विशेष उपक्रम, निविष्ठांची आवश्यकता व गुणवत्ता नियंत्रण, केंद्र व राज्य पुरस्कृत योजना, पिक विविधीकरण, पिक विमा योजना, अपघात सुरक्षा योजना, किसान सन्मान निधी योजना, फलोत्पादन क्षेत्र व उत्पादकता वाढ, स्मार्ट प्रकल्प, संजीवनी प्रकल्प (पोकरा), कृषी पंपासाठी वीज जोडणी, पतपुरवठा, पाणीपुरवठा आणि संलग्न विभागांच्या योजना.

सदर बैठकीसंदर्भातील सर्व आवश्यक तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!