जळगाव

सावदा गावा नजीक अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई

जळगाव – ( जिमाका ) – रावेर ते सावदा रस्त्यावर गस्त करीत असताना अवैध वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 26 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या MH -04 FJ 3248 या क्रमांकाच्या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यात सागवान पलंगाचे चार नग व एक सोपासेट मिळून आले.

या माला विषयी 27 वर्षीय वाहन चालक गणेश भीमराव खैरनार यास पास परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. सागवान पलंग व सोपा मालाचे मोजमाप घेतले असता 0.524 घ.मी एवढा असून या मुद्देमालाचा बाजार भाव अंदाजे किंमत 64500 रुपये असून ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहतूक गाडीची अंदाजे किंमत 126000 रू. असून एकूण रक्कम= 190500 एवढी आहे.

या वाहनाच्या पुढील चौकशीसाठी हे वाहन आगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. ही कारवाई ही वनसंरक्षक धुळे(प्रा.) वनवृत्त धुळ्याच्या नीनू सोमराज, उप वनसंरक्षक जमीर शेख , व विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे आर .आर.सदगीर तसेच चोपडा येथील सहायक वन संरक्षक प्रथमेश हळपे, सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई ही रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय ना.बावणे , रावेरचे वनपाल रवींद्र सी.सोनवणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक जुनोना जगदीश जगदाळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!