जळगाव
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण

जळगाव- (जिमाका)- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वन विभागाच्या सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण तसेच वन विभागाचे कॉफी टेबल बुक आणि सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपवन संरक्षक (वन्यजीव) जमीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
सातपुडा जंगल सफारीला नव्या पाच गाड्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे सातपुडा परिसरातील वन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.