जळगावताज्या बातम्या

वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई

जळगाव – ( जिमाका )- चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगांव कक्ष क्र. २६० मध्ये अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक २४ जानेवारी रोजी मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी वनरक्षक श्री. प्रकाश सुभाष पाटील यांच्यावर वाहन चढवून गंभीर जखमी केले.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विना क्रमांकाची मोटारसायकल,सागवान लाकूड ०.१५१ घ.मी असून त्याची अंदाजे किंमत ३०५६ रु. आणि इतर साधने समाविष्ट होती. पुढील तपासादरम्यान चौगांव येथील एका आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कटाई मशीन, लाकूड कापण्याची अवजारे, ३५ सागवान लाकूड नग आणि तयार पलंग या सर्वाची मिळून एकूण किंमत १,१४,६४४ रु. होते, या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली. आरोपींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जखमी वनरक्षक श्री. प्रकाश पाटील यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले हे गंभीर बाब असून, असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!