जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मे.दिवाणी व फौजदारी न्यायालयात वृक्षरोपवन

दोंडाईचा – (प्रतिनिधी) – मे.दिवाणी व फौजदारी न्यायालय दोंडाईचा ता. शिंदखेडा, जि.धुळे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपवन न्यायालयाचे न्यायाधीश मा.श्री. आदित्य नाईक साहेब, न्यायाधीश मा.श्रीमती आर. डी. पवार मॅडम यांच्या हस्ते करंज, बदाम, शिसू, सीताफळ,बेल,निम आदी रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात सामाजिक वनीकरण शिंदखेडा चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.विक्रम पदमोर, सरकारी वकील ॲड.श्री.गंगावणे,दोंडाईचा बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. श्री. जयवर्धन तायडे, ॲड. अशोक पाटील, ॲड.शाह, ॲड. सौरभ भावसार, ॲड. संतोष भोई, ॲड. श्री.चौधरी, ॲड.आशा मंसुरी, ॲड. मनिषा वाघ, सहाय्यक अधीक्षक सौ.बी.एन बागल, लिपिक श्री. दिग्विजय येवले, श्री. पवार,श्री पंकज पगारे, श्री. बधान,श्री आढाव, बेलीफ श्री.पवार, शिपाई श्री.मराठे,श्री.ठाकरे, सामाजिक वनीकरण शिंदखेडा चे वनपाल श्री.मुकेश सोनार, श्री.दिपक मोरे , वनरक्षक श्री. प्रभाकर पाटील, श्री. रविंद्र ठाकरे , श्रीमती यमुना पवार हे उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिननिमित्ताने मा.न्यायधीश दोंडाईचा श्री. आदित्य नाईक साहेब आणि मा.न्यायधीश शिंदखेडा श्रीमती. विनिता नाईक मॅडम यांनी सर्व लोकांनी व अधिकारी, कर्मचारी यांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे व ती वृक्ष जगविणे हे स्वतःचे आयुष्याची गरज असल्याने कर्तव्य म्हणून सर्वांनी वृक्षलागवडीचे काम करावे असे आव्हान केले आहे.
या कार्यक्रमास वनमजुर मच्छिंद्र मोरे, ज्ञानेश्वर मोरे, गणेश पाटील, किशोर कुंवर, रमेश बागुल, आकाश भील, भीम मोरे यांनी यशस्वीतेसाठी वन कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
तसेच ल्युपीन फाऊंडेशन शिंदखेडा चे व्यवस्थापक श्री. तुकाराम मासुळे आणि त्यांची टीम यांचे मदतीने वन महोत्सव कालावधीत जंगली झाडांचे बी लागवड करणे करिता सीड्स बाॅल तयार करित जनजागृती कार्यक्रमाद्वारे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आले.